Fibroids (गर्भाशयातील गाठी)

गर्भाशयातील गाठी

Fibroids (गर्भाशयातील गाठी) | Dr. Nilesh Balkawade

Q . Uterine fibroids म्हणजे काय?

Uterine fibroids ज्याला leiomyoma, myoma किंवा fibroma असेही म्हणतात. या गर्भाशयातील मासपेशींपासून उत्पन्न होणाऱ्या गाठी असतात. या गाठीगर्भाशयात कुठल्याही भागात उत्पन्न होऊ शकतात जसं की अंतगर्भाशया जवळ (submucous), गर्भाशयाच्या भिंतीमध्ये (Intramural) किंवा बाहेरील आवरणाजवळ (Subserous).  Fibroids च्या उगमस्थानापासून त्यांची लक्षणे व उपचारपद्धती निश्चित होते.

Fibroids हे एक किंवा अधिक असू शकतात. तसेच वेगवेगळ्या आकाराचेही असू शकतात. या गाठी साधारणतः खूप सावकाश वाढणाऱ्या असतात. यांचा आकार अचानक वाढू लागला किंवा या गाठी आधी पासूनच मोठ्या व अंतगर्भाशया जवळ असतील तर त्यांची लक्षणे दिसू लागतात.

काहीच लक्षणे नसतील आणि सोनोग्राफीवर निदान झाले असेल, तरआपण या गाठीं वर लक्ष ठेवून गरज पडल्यासच उपचार करू शकतो !

 

  1. Fibroids कुणाला होण्याची शक्यता अधिक असते ?

Fibroids या गाठी साधारणतः ३०-४० या वयातील प्रजननशील महिलांमध्ये अधिक आढळतात, परंतु काही वेळा विशीमध्ये किंवा रजोनिवृत्तीच्या जवळ असलेल्या महिलांमध्ये देखील fibroids सापडू शकतात. Fibroids विकसित होण्याची कारणेअज्ञातआहेत. परंतु अनुवांशिकता तसेच संप्रेरकांमधील बदल  fibroidsच्या विकासास उत्तेजन देण्याची भूमिका बजावतात.

 

  1. Fibroids च्या गाठीमुळे कर्करोगाची शक्यता किती असते?

Fibroids च्या गाठीमुळे कर्करोगाची शक्यता खूप कमी म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा कमी असते. यागाठी सौम्य स्वरूपाच्या किंवा Benign असतात. त्यामुळे fibroid चे निदान झाल्यावर घाबरून न जाता त्यावर तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व उपचार घ्यावेत !

 

  1. Fibroids ची लक्षणं काय असू शकतात ?

बऱ्याच वेळा fibroids असलेल्या स्त्रियांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत ,याला asymptomatic fibroid असे म्हणतात.काही वेळा वेगवेगळी लक्षणं देखील सापडू शकतात. ही लक्षणं fibroid च्या उगमस्थानावरअवलंबूनअसतात.

-मासिक धर्मामध्ये अतिरिक्त रक्तस्त्राव किंवा अतिरिक्त वेदना

-रक्तक्षय

-Fibroid च्या दबाबामुळे उत्पन्न होणारी लक्षणे जसे की लघवीची वारंवारता, शौचामध्ये अडचणी, इत्यादी !

 

  1. Fibroids चे अचूक निदान शक्यआहे का ?

होय !आजकालच्या अत्याधुनिक निदानपद्दती मुळे fibroids चे अचूक निदान शक्य आहे.

१. Ultra sonography – यामध्ये fibroid चाआकार,fibroid चे उगमस्थान ,आजूबाजूच्या अवयवांशी असलेले नाते इत्यादी समजू शकते

त्याच बरोबर ३D – USG  ने fibroid mapping करता येते जेणे करून शस्त्रक्रियेची गरज भासल्यास ती सुलभ होऊ शकते !

२. Hysteroscopy ने अंतगर्भाशया जवळील fibroid चे अचूक निदान व उपचार एकाच sitting मध्ये करता येतात.

३. HSG – Hysterosalpingography – special Xray

४. S S G –Saline Sonography

५. Laparoscopy- दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेने fibroids चे निदान व उपचार दोन्ही शक्य आहे.

६. MRI-  गरज पडल्यास क्लिष्ट अश्या fibroids मध्ये MRI उपयुक्त ठरले.

 

  1. प्रत्येक fibroids वर उपचार गरजेचे आहेत काय ?

Asymptomatic किंवा लक्षणे नसलेल्या महिलांमध्ये सामान्यतः उपचार आवश्यक नसतात.  fibroids अचानक वाढत तर नाही ना…  हे सुनिश्चित करण्यासाठी नियमित देखरेख तेवढी ठेवली जाऊ शकते .

लक्षणे असलेल्या महिलांमध्ये, fibroids ना विविध प्रकारच्या उपचारांनी ठीक केले जाऊ शकते !

 

  1. Fibroids म्हणजे Hysterectomy किंवा गर्भाशय काढून टाकणे असे काहीसे समीकरण रुजले आहे, हे कितपत योग्य आहे?

 

आजकाल Hysterectomy किंवा गर्भाशय काढून टाकणे हा fibroids वरील उपचारांमध्ये शेवटचा पर्याय मानला जातो .

– प्रगत तंत्रज्ञानाने योग्य औषधोपचार, Minimally invasive शस्त्रक्रिया याने fibroids चे उपचार विना hysterectomy शक्य आहेत.

ज्या स्त्रिया वंध्यत्वावर उपचार घेत असतील व fibroids मुळे मूल होण्यास अडचणी येत असतील, अश्या स्त्रियांमध्ये योग्य औषधोपचार व दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय न काढता फक्त fibroids वर उपचार शक्य आहेत.

औषधोपचारा मध्ये जी औषधे समाविष्ट आहेत त्यामध्ये काही गर्भनिरोधक गोळ्या, वेदनाशामक औषधे, लोहयुक्त गोळ्या, मासिक पाळी मध्ये रक्तप्रवाह कमी करण्यासाठीची औषधे, GnRH analogue  (ज्याऔषधांनी इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचे शरीरातील उत्पादन कमी होऊन fibroids चा आकार कमी होऊ शकतो.) Selective Progesterone Receptor modulator, हे देखील fibroids ची वाढ कमी करतात.

-काही वेळा गर्भाशयामध्ये प्रोजेस्टेरॉन संप्रेरक सोडणारी उपकरणं , ज्याला की प्रोजेस्टेरॉन इंट्रा युटेरीन डेविस म्हणतात, बसवले जाऊ शकते !

Minimally invasive शस्त्रक्रियेमध्ये Hysteroscopy ने गर्भाशयाच्या आत दुर्बिणीने किंवा Laparoscopy म्हणजे पोटात दुर्बीण टाकून fibroids च्या  गाठी  काढता येऊ शकतात. याला Myomectomy असे म्हणतात. UAE(Uterine  artery  Embolisation ), MRG-FUS

तसेच लेसर ही काही अद्यावत पद्धती देखील सोयीची ठरू शकते. या सर्व उपचारांमध्ये गर्भाशय काढण्याची गरज नसते.

 

  1. गर्भाशय काढण्याची गरज केव्हा निर्माण होते?

ज्या महिला रजोनिवृत्तीच्या जवळ असतील, fibroids ची गाठ क्लिष्ट असेल, कर्करोगजन्य असण्याची शक्यता असेल, किंवा इतर उपाय अक्षम ठरले असतील , अश्यावेळी गर्भाशय काढणे (Hysterectomy ) हा उपाय असू शकतो.

 

  1. गर्भावस्थेत fibroid वर कोणते उपचार केले जाऊ शकतात ?

गर्भावस्थेत fibroids चे उपचार हे symptomatic किंवा लक्षणाधारित असतात. वेदना कमी करण्यासाठी योग्य आराम, Hydration तसेच औषोधोपचार करता येतात. fibroids काढण्याची शस्त्रक्रिया गर्भावस्थेत टाळावी लागते. प्रसूतीवेळी गुंतागुंत निर्माण होत असल्यास cesarean myomectomy करता येऊ शकते.

 

स्त्री-शक्ती तुला सलाम !

बंजर नहीं हूं मैं, मुझ में बहुत सी नमी है

बस दर्द बयाँ नही करती, मुझ में इतनी कमी है |

 

डॉ  निलेश बलकवडे

स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ

Scroll to Top