मला आई व्हायचंय !

‘आई’ – ” तू मंदिराचा ऊंच कळस

तू अंगणातील पवित्र तुळस

तू भजनातील संतवाणी

तू वाळवंटातील थंड पाणी “

– आई ची महती अजून कार्य वर्णावी !

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे \”मातृत्व \”. जगामध्ये प्रेमाची सर्वात सुंदर अनुभूती कुठली असेल तर ते आहे मातृत्व. यासर्वांचा अनुभव आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून आपण घेत आलो आहोत ! त्यामुळे साहजिकच आपण स्वतःही  ‘आई’ व्हावं ही एक स्वाभाविक व नैसर्गिक इच्छा स्त्रीच्या मनात असू शकते. या भावनेतूनच ओठांवरची शब्द फुटतात – मला आई व्हायचंय !

आई होणं ही एक आनंदाची अनुभूती असते. रुढी परंपरागत अनेक कार्यक्रम जसे की डोहाळेजेवण,पाचवीपूजन, बारसे, असे या आनंदसोबत जोडलेले असतात याहीपेक्षा अधिक सुख देतं ते बाळाचं असणं , त्याचं हसणं , पहिली किलकारी, पाहिलं पाऊल ! पाहिलं उच्चारलेलI शब्द देखील ‘आई’ हाच असतो. ‘आईपण ‘ हे पतिपत्नी च्या नात्यामधील दुवा बनून येतं . ते नातं अधिक घट्ट होतं . सासू सासरे आई वडील सर्वजण या नवीन नात्यात रममाण होतात. तिला पूर्णत्व येतं. काही आजारांपासून देखिल मातृत्व हे संरक्षण करतं असतं!

यासर्व आनंदा बरोबर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अंत्यत वेगळी परिस्थिती असते. जी स्त्री काही कारणाने व्यंधत्वाचा सामना करत आहे , ‘आई ‘ बनण्यास काही अडथळा येत आहे , अश्या स्त्रीला आपल्या समाजात- पारिवारिक, संसारिक तसेच सामाजिक त्रासाला सामोर जाव लागतं. त्याचबरोबर प्रत्येक मासिक पाळी बरोबर येणारं दडपण मानसिक ताण आणखी वाढवत असतं , या वेळी पती पत्नी मध्ये उत्तम समन्वय असणं खूप गरजेचं आहे. आज २१ व्या शतकामध्ये देखील समाजात संततीहीन स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नसेल तर हे आपल दुर्भाग्य आहे. या ताणामुळे काही स्त्रिया या उदासीन होतात व काही नैराश्याने ग्रासल्या जातात.

‘आई होणं ‘ याला आणखी एक कंगोरा आहे, तो म्हणजे यासाठी योग्य वेळ कोणती? काही दाम्पत्य आमच्याकडे लग्नाला वर्ष पूर्ण होण्याच्या आतच येतात, तर काही जणांना स्वतःसाठी व करिअर साठी वेळ हवा असतो. मला वाटतं हे दोन्हीही ‘जस्टिफाईड’ आहे. प्रत्येक व्यक्तीला पालकत्व कधी स्वीकारावं याचा अधिकार व स्वातंत्र्य असायला हवं. यासाठी घरच्यांनी व समाजाने त्यांना योग्य सहकार्य करायला हवं. हे सर्व करत असताना त्यांनी योग्य असा वैद्यकीय सल्ला घ्यावा. याला आम्ही Preconceptional counseling असं म्हणतो. सुरक्षित मातृत्वासाठी हा सल्ला मोलाचा ठरतो. आई होण्याची योग्य वेळ कोणती हे ठरवताना एक गोष्ट महत्वाची ठरते ते म्हणजे ovarian reserve किंवा अंडकोषातील बीजांची संख्या. सामान्यतः ३५ वयानंतर ही संख्या व त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते. अशा गोष्टींचा विचार देखील करायला हवा.

एक वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व म्हणतो. हे का होत असावं , यासाठी अचूक निदान खूप महत्वाचं आहे. काही वेळा पुरुष, काही वेळा स्त्री, तर काही वेळा दोघांमध्येही अडचणी असू शकतात. वैद्यकीय सल्ला तसेच आधुनिक निदान पदधतींचा अवलंब करून आपण अचूक उपचार करू शकतो. याला शास्त्रीय उपचार पद्धती म्हणतात. अंधश्रद्धा, अशास्रीय उपचार यांना  दूर  लोटून  आपण योग्य तेच निवडले पाहिजे. यामुळे वंध्यत्व तंज्ञांचा (Fertility specialist) सल्ला मोलाचा ठरतो.

‘मला आई व्हायचंय डॉक्टर’ या प्रश्नाच्या समस्या निवारणासाठी आम्हा तज्ज्ञांच्या भIत्त्यामध्ये अनेक उपाय आहेत. योग्य सल्ला, औषधे, नियोजित समयी  समागम, IUI, IVF , ICSI , इत्यादी. काही वेळा Embryo biopsy (PGT), ERA, दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया यांचा देखील अवलंब करता येतो. पुरुष वंध्यत्वासाठी MACS , IMSI , PICSI , TESA  इत्यादि आधुनिक उपचार वापरता येतात. सर्वांसाठी सर्व उपाय नसून  ‘ योग्य व्यक्तीसाठी योग्य उपाय ‘ आखावे लागतात. समस्या कितीही कठीण असली तरी देखील योग्य उपचारांनी  ‘आई’ होणं शक्य आहे ! त्यासाठी हवा सकारात्मक दृष्टीकोन , परिवार आणि तज्ज्ञांची साथ !

ज्यांना गर्भधारणा उशिरा हवी असेल असे दाम्पत्य GAMETE किंवा Embryo Freezing चा आधार घेऊन आपल्या इच्छेने ठरवलेल्या समयी देखील  ‘आई-वडील ‘ होऊ शकतात. याला मी Millenial Mom असं म्हणतो.

आपल्या इच्छेचं बीज योग्य मातीत रुजवा तरच मनोवांछित अंकुर फुटतील!

तिच्या ‘ इच्छा , तिच्या आकांक्षा ऊंच भरारी घेउ दे . . . . . . .

मनात माझ्या ही इच्छा , ‘तिला’ ही आई होऊ दे. . . . . . .

Scroll to Top